बिहार निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, 'संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार'

फोटो स्रोत, ANI
राहुल गांधी यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना, निकाल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं.
"महागठबंधनवर विश्वास दाखवलेल्या बिहारच्या कोट्यवधी मतदारांचे मी आभार मानतो. बिहारमधील निकाल खरंच आश्चर्यकारक आहेत," असं राहुल गांधींनी म्हटलं.
"सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेल्या एका निवडणुकीत आम्हाला विजय मिळवता आला नाही. हा लढा संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाचा आहे.
काँग्रेस पक्ष आणि INDIA आघाडी या निकालाचं सखोर समीक्षण करेल आणि लोकशाही वाचवण्यासाठीचे प्रयत्न आणखी प्रभावीपणे करत राहू," असंही राहुल गांधींनी म्हटलं.





















