राष्ट्रीय कुस्तीपटूंना करावी लागतेय मजूरी...

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

अर्शदीप कौर आणि संदीप कौर पंजाबच्या मोगा जिल्ह्यात शेतमजूर म्हणून काम करतात. माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.

"माझ्या आहाराचा खर्च भागवण्यासाठी मला मजूरी करणं भाग आहे. मी दहावीत शिकते. मी रोज पहाटे 4 ला उठते आणि आईला घरकामात मदत करते. मग मी प्रॅक्टिस करते आणि मग शेतात मजूरी. त्यानंतर संध्याकाळी मी पुन्हा आईला मदत करते," अर्शदीप सांगते.

भाताची लावणी करता करता या कुस्तीपटू ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हायची स्वप्न पाहातात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)