रुबीज गोवन किचन : गोव्याची लज्जत कराचीत
पाकिस्तानातील गोवन फुड चाखायचं असेल तर 'रुबीज गोवन किचन' हे कराचीवासीयांसाठी एक लज्जतदार पर्याय ठरत आहे.
फाळणीनंतर रुबी यांचं कुटुंब गोव्यातून कराचीत स्थलांतरीत झालं होतं. घरात आधीपासून गोवन सी-फूड त्या तयार करायच्या. नंतर हे सी-फूड त्यांच्या ओळखीच्यांमध्ये लोकप्रिय झाल्याने त्यांनी घरगुती व्यवसाय सुरू केला. फेसबुक पेजवरून त्या आता ऑर्डर स्वीकारतात, आणि आता अख्ख्या कराचीत त्यांचं सी-फूड प्रसिद्ध आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)