ताडोबा, गडचिरोलीतले हत्ती जामनगरला हलवण्याला विरोध का होतोय?
महाराष्ट्राच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि गडचिरोली इथून तेरा हत्ती गुजरातच्या जामनगरमधल्या खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवण्याचा निर्णय मे 2022मध्ये वन विभागाने घेतला.
या निर्णयाला राज्य आणि केंद्रसरकारनेही परवानगी दिली आहे. पण, प्रश्न हा आहे की, आपल्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांना बंदिस्त प्राणी संग्रहालयात का पाठवायचं? त्यासाठीच प्राणीहक्क संघटना आणि स्थानिक लोकांनीही याला विरोध केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. आणि वन विभागाने पत्रक काढून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली. अखेर वर्तमानपत्रात आलेली एक बातमी बघून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे. आणि आता कायदेशीर सुनावणी सुरू होणार आहे. हत्तींच्या हस्तांतरणाचा निर्णय आणि त्याविषयीचे कायदे जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)