कोरोना ऑनलाईन शिक्षण : टॅब घेऊ शकत नसल्याने दहावीतला अभिषेक संत जेव्हा जीवन संपवतो...

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना ऑनलाईन शिक्षण : टॅब घेऊ शकत नसल्याने दहावीतला अभिषेक संत जेव्हा जीवन संपवतो...

अभिषेक राजेंद्र संत याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब घेण्याची ऐपत नाही म्हणून त्याने आत्महत्या केली.

बीड जिल्ह्यातील भोजगावमध्ये राजेंद्र संत यांचं कुटुंब राहतं. दोन मुलांच्या शिक्षणासाठी संत दाम्पत्य 15 वर्षांपासून उसतोडणीला जातं. अहमदनगर जिल्ह्यातील निवासी शाळेत अभिषेक आणि रामेश्वर शिकत होते. लॉकडाऊननंतर ते घरी आले होते.

कोरोना संकटामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी त्याने वडिलांकडे टॅब मागितला होता. भोजगावात इंटरनेट नेटवर्क मिळत नाही.

गावात जोडणारा रस्ताही योग्य स्थितीत नाही.

ग्रामिण भागात असे अभिषेक आहेत ज्यांच्यासमोर ऑनलाईन शिक्षण कसं मिळवायचं हा प्रश्न आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)