व्हीडिओ : 'प्लॅस्टिक बंदीमुळे 28 वर्षांची मेहनत शून्य झाली!'
महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची कडक अमलबजावणी सुरू झाली असून राज्यभरात केवळ उत्पादक आणि विक्रेतेच नव्हे तर आता सामान्य नागरिकांवरही प्रतिबंधित प्लास्टिक उत्पादनं वापरल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे.
हा निर्णय जाहीर झाला होता, तेव्हा पर्यावरणवाद्यांकडून त्याचं कौतुक झालं होतं. पण प्लॅस्टिक उत्पादनांच्या व्यवसायात असलेल्या अनेकांना या निर्णयाचा फटका बसला आहे.
मंदार दळवी हे प्लॅस्टिक पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्याचे मालक आहेत. 28 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. पण राज्य सरकारच्या या निर्णयानंतर हा व्यवसाय बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
मंदार दळवी यांच्याप्रमाणेच अनेक व्यावसायिकांना या निर्णयाची झळ सोसावी लागत आहे. तसंच प्लॅस्टिकबंदीमुळे सुमारे पाच लाख कामगार बेरोजगार होण्याची भीती आहे.
या निर्णयाविरोधात आता व्यावसायिकांनी कोर्टात धाव घेतली आहे.
रिपोर्टर - योगिता लिमये
शूटिंग आणि एटिंग - विष्णू वर्धन, जॅल्सन एसी
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)