महिलांचा आवाज बुलंद करणारं लोकनृत्य

व्हीडिओ कॅप्शन, गिद्धा : महिलांना व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम

गिद्धा ही पंजाबमधील प्राचीन लोककला आहे. फक्त स्त्रियांनीच गिद्धा करायचा असतो. पूर्वी तर पुरुषांना गिद्धा पाहण्याची सुद्धा परवानगी नव्हती.

आता मात्र गिद्धाचं स्वरुप बदललं असून गिद्धा सर्वांसमोर सादर केला जातो.

गाणी, संगीत, नृत्य, अभिनय एकत्र करून गिद्धा केला जातो.

गिद्धाद्वारे या स्त्रिया लोकांचं प्रबोधन करतात पण ते करताना त्या कधीही सामाजिक भान विसरल्या नाहीत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)