हरियाणाची कविता देवी भारताची पहिली महिला WWE कुस्तीगीर

व्हीडिओ कॅप्शन, हरियाणाची कविता देवी भारताची पहिली महिला WWE कुस्तीगीर

WWE अर्थात वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला कुस्तीगीर म्हणजे हरियाणाची कविता देवी.

सलवार सूट घालून WWEच्या रिंगणात उतरलेल्या कविता देवीची छायाचित्रं वायरल झाली होती.

'द ग्रेट खली'च्या अकादमीमध्ये कविता देवी कुस्तीचा सराव करते. पण एक भारतीय महिला WWEमध्ये पोहोचली कशी?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)