2 वर्षांच्या युद्धाने गाझाची काय अवस्था केली? गाझामधून बीबीसीचा रिपोर्ट
2 वर्षांच्या युद्धाने गाझाची काय अवस्था केली? गाझामधून बीबीसीचा रिपोर्ट
दोन वर्षं युद्धामुळे गाझाची काय अवस्था झाली आहे हे दाखवणारा हा रिपोर्ट. BBC आणि इतर काही पत्रकारांना इस्रायली लष्कराने अत्यंत नियंत्रित स्वरुपात गाझामध्ये प्रवेश दिला.
हे लक्षात घेणं गरजेचं आहे की इस्रायलने गाझामधून बीबीसीसह कुठल्याही आंतरराष्ट्रीय माध्यमांना स्वतंत्रपणे बातमी देण्याची मुभा दिलेली नाही. IDF च्या नियंत्रणात असलेल्या एका भागाला बीबीसीने भेट दिली. इतर प्रदेश किंवा पॅलेस्टिनी लोकांशी बोलण्याची संधी पत्रकारांना IDF ने दिली नाही. इस्रायलमधल्या लष्करी सेन्सॉरशिपच्या कायद्यांप्रमाणे प्रसारणापूर्वी हा रिपोर्ट IDF ला दाखवला गेला होता. पण बीबीसीने या वार्तांकनावर संपादकीय नियंत्रण ठेवलेलं आहे. लुसी विल्यमसन यांचा हा रिपोर्ट.



