कोल्हापुरात दोन गटांमध्ये दगडफेक, वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात दोन गटांमध्ये दगडफेक, वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात शुक्रवारी एका मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टिमवरून दोन गटांकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.
कोल्हापूरातील सिद्धार्थ नगर - राजे बागसवार परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
या हिंसाचारात 10 जण जखमी झाले आहेत. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



