You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचे वास्तव नेमकं काय? - ग्राउंड रिपोर्ट
बोगस मतदारांची नावं आणि पत्ते यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघ चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने 6861 जणांची यादी रद्द केली आणि चौकशीचे आदेशही दिले. शिवाय या संदर्भात पोलिसांनी एफआयआरही दाखल करुन घेतला.
या एफआयआरमधील काही नावांचा आणि पत्त्यांचा तपास करत बीबीसी मराठीची टीम राजुरा मतदारसंघात पोहचली. त्यातून मिळालेली माहिती चकीत करणारी आहे.
तसेच ताज्या आरटीआयमधून समोर आलेली माहिती बोगस नावं अधिक असल्याची शक्यता दर्शवते. बीबीसी मराठीचा हा एक्सक्लुझिव्ह आणि इनव्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- मनोज आगलावे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)