कर्ज काढलं, संघर्ष केला आणि भाविनाने भारताला पॅरालिम्पिक पदक मिळवून दिलंच...

व्हीडिओ कॅप्शन, कर्ज काढलं, संघर्ष केला आणि भाविनाने भारताला पॅरालिम्पिक पदक मिळवून दिलंच...
कर्ज काढलं, संघर्ष केला आणि भाविनाने भारताला पॅरालिम्पिक पदक मिळवून दिलंच...
भाविना पटेल

पॅरालिम्पिक पदक विजेत्या भाविना पटेल यांना हे यश सहजासहजी मिळालं नव्हतं.

एक काळ असा होता जेव्हा कुठलंच पाठबळ नसल्याने त्या स्वखर्चाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या.

त्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचता यावं यासाठी वडिलांनी कर्जही काढलं होतं. टेबल टेनिसमध्ये ऑलिम्पिक स्तरावर पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत.

भाविना यांना 2022 सालचा BBC Indian Para Sportswoman of the Year हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.