अनामिक दात्याकडून नवं हृदय मिळालेल्या तरुणाची कहाणी
अनामिक दात्याकडून नवं हृदय मिळालेल्या तरुणाची कहाणी
अक्षय तमायचीकर या तरुणाला वयाच्या 26 व्या वर्षी पहिला हार्ट अटॅक आला. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरूही झाले. पण हार्टअटॅकची मालिका सुरूच राहिली. तीन हार्ट अटॅक आणि अनेकवेळा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर त्याचं हृदय अगदीच कमकुवत झाल्याचं लक्षात आलं.
त्याने अनेक उपचारपद्धती, डॉक्टरांची मदत घेतली, पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती वेगानं ढासळत गेली. असंच सुरू राहिलं तर हृदय निकामी होईल अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.
यावर एकच उपाय होता, तो म्हणजे नवं हृदय बसवण्याचा.
एका अनामिक दात्याकडून अक्षयला नवं हृदय मिळालं.
- रिपोर्ट - ओंकार करंबेळकर
- शूट - शाहीद शेख
- व्हीडिओ एडिट - निलेश भोसले






