You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवी मुंबई विमानतळ सुरू, दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी
नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज म्हणजे 25 डिसेंबर 2025 पासून देशांतर्गत उड्डाणांना सुरू झाली आहे.
इंडिगो एयरलाईनचं बंगळुरूहून आलेलं विमान नवी मुंबईत उतरलेलं पहिलं कमर्शियल म्हणजे प्रवासी विमान ठरलं. सकाळी आठ वाजता हे विमान उतरलं, तेव्हा पारंपरिक वॉटर सॅल्यूटसह त्याचं स्वागत करण्यात आलं.
त्यानंतर सकाळी 8:40 वाजता इंडिगोच्या हैदराबादला जाणाऱ्या विमानानं इथून पहिलं टेक ऑफ केलं.
पहिल्या दिवशी इथे 15 विमानं उतरण्याची आणि 15 विमानं उड्डाणं करण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा या देशातल्या आघाडीच्या विमान कंपन्या नवी मुंबईतून उड्डाणं सुरू करणार आहेत.
दोन धावपट्ट्या (रनवे) असलेल्या या विमानतळाचा पहिला टर्मिनल पूर्ण झाला आहे आणि 2036 पर्यंत नवी मुंबईत चार टर्मिनल उभे राहणार आहेत.
त्यामुळे मुंबई परिसरातील हवाई वाहतुकीचा मोठा भार हा विमानतळ उचलणार आहे.
या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जावं अशी स्थानिकांची मागणी आहे. पहिल्या दिवशी काही प्रवासी या मागणीचे फलक घेऊन आलेले दिसले.
नवी मुंबईतला हा विमानतळ सुरू झाल्यावर मुंबईतल्या सध्याच्या विमानतळाचं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (CSMIA) काय होईल? इथे वाचा.