अजित पवारांचा फोन आणि महिला IPS अधिकाऱ्यांचं उत्तर, सोलापुरात नेमकं काय घडलं?

अजित पवारांचा फोन आणि महिला IPS अधिकाऱ्यांचं उत्तर, सोलापुरात नेमकं काय घडलं?

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका गावातील व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याच व्हीडिओमुळे विरोधकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. हे प्रकरण आहे माढा तालुक्यातील कुर्डू गावचं कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरण.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून "कारवाई थांबवा" असे आदेश दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

यानंतर प्रशासकीय कारवायांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)