अपघातग्रस्त बोईंग 787 ड्रीमलायनर विमान काय आहे?
अपघातग्रस्त बोईंग 787 ड्रीमलायनर विमान काय आहे?
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं जे विमान कोसळलं, ते बोईंग 787-8 प्रकारचं विमान होतं, जे ड्रीमलायनर नावानंही ओळखलं जातं.
बोईंग कंपनीने 14 वर्षांपूर्वी हे एअरक्राफ्ट लाँच केलं होतं. या प्रकारच्या विमानांनी आजवर 1 अब्ज प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती कंपनीने सहा आठवड्यांपूर्वी दिली होती.
जगभरात 1,175 बोईंग 787 ड्रीमलायनर विमानं वापरात आहेत. न थांबता लांब पल्ल्याचा प्रवास करण्याच्या क्षमतेमुळे ही विमानं नॉनस्टॉप फ्लाईटसाठी वापरली जातात.
व्हीडिओ - जान्हवी मुळे



