सोलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग, जाणून घ्या आतापर्यंत काय माहिती समोर
सोलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग, जाणून घ्या आतापर्यंत काय माहिती समोर
सोलापूरमधील चिंचोळी भागात असलेल्या MIDC मधील एक कंपनीला आग लागली. ही केमिकलची कंपनी असल्याची माहिती आहे.
आग लागल्यानंतर या कंपनीतून मोठ्याप्रमाणात स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिकांनी सांगितलं.
ही आग भीषण असल्यानं सध्या कंपनीकडे कुणीही जाऊ नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाहीये.
आग वाढली तर आसपासच्या लोकांना दुखापत होऊ नये म्हणून या कंपनीच्या आसपसचा परिसरसुद्धा खाली करण्यात आला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






