'सरकारने आम्हा रोहिंग्यांना हात बांधून समुद्रात नेलं, मग बोटीतून फेकून दिलं'
'सरकारने आम्हा रोहिंग्यांना हात बांधून समुद्रात नेलं, मग बोटीतून फेकून दिलं'
बीबीसीने अशा काही रोहिंग्या निर्वासितांशी खास संवाद साधला आहे, ज्यांना भारतीय सरकारने देशाबाहेर काढून म्यानमारच्या किनाऱ्याजवळ समुद्रात सोडून दिले. म्यानमारमध्ये सध्या एक क्रूर गृहयुद्ध सुरू आहे.
रोहिंग्या ही प्रामुख्याने मुस्लीम अल्पसंख्याक जमात असून, ती म्यानमारच्या लष्करी राजवटीकडून हिंसक छळ आणि नरसंहाराला सामोरी जात आहे. दहा लाखांपेक्षा जास्त रोहिंग्या भारतासह शेजारच्या देशांमध्ये पळून आले आहेत. त्यांना भारतीय अधिकाऱ्यांनी कसं पकडलं आणि कसं समुद्रात सोडून दिलं, हे या निर्वासितांनी बीबीसीला सांगितलं.
बीबीसीच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी समीरा हुसेन यांचा दिल्लीहून रिपोर्ट.



