सिंधुदुर्गात बायोगॅसच्या माध्यमातून हजारो महिलांचं आयुष्य बदललं; ही 'निळी क्रांती' काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : सिंधुदुर्गात 9500 बायोगॅस, हजारो महिलांचं आयुष्य बदललं; ही ‘निळी क्रांती’ काय आहे?
सिंधुदुर्गात बायोगॅसच्या माध्यमातून हजारो महिलांचं आयुष्य बदललं; ही 'निळी क्रांती' काय आहे?
Published

सिंधुदुर्गात गेल्या 25 वर्षांत 9500 पेक्षा अधिक बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आल्याचं भगिरथ प्रतिष्ठान ही संस्था सांगते. या चळवळीमुळे ग्रामीण घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा पर्याय उपलब्ध झाला, स्वयंपाकघरातील धूर कमी झाला आणि अनेक महिलांचा वेळही वाचला.

ही बायोगॅस चळवळ नेमकी कशी वाढली? बायोगॅस वापरणाऱ्या महिलांच्या आयुष्यात काय बदल झाला? आणि या कामातून स्थानिक तरुणांना रोजगार कसा मिळाला?

सिंधुदुर्गातील या ‘निळ्या क्रांती’ची ही कहाणी.

रिपोर्ट: अल्पेश करकरे

शूट: शार्दुल कदम

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)