कोलकाता पीडितेचे आई-वडील म्हणाले, 'जे घडलं ते चुकीचं होतं, न्याय हवा'

व्हीडिओ कॅप्शन, कोलकाता पीडिते डॉक्टरचे आई वडील म्हणाले, 'जे घडलं ते चुकीचं होतं, न्याय हवा'
कोलकाता पीडितेचे आई-वडील म्हणाले, 'जे घडलं ते चुकीचं होतं, न्याय हवा'

कोलकातामध्ये एका 31 वर्षीय डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येमुळे अख्खा देश हादरला. पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला.

कोलकात्याच्या या पीडित डॉक्टरच्या आई-वडिलांशी बीबीसीने त्यांच्या घरी जाऊन संवाद साधला. त्यांच्या मुलीच्या भीषण हत्येनंतर त्यांचं सर्वसामान्य असं घर मीडियाने वेढलेलं आहे.

(या व्हीडिओ रिपोर्टमधून पीडितेच्या आईवडिलांची नावं काढून टाकण्यात आली आहेत. तसंच त्यांचे आवाज बदलण्यात आले आहेत.

भारतीय कायद्यानुसार बलात्कार पीडितेची किंवा तिच्या कुटुंबीयांची ओळख सार्वजनिक करण्यास मनाई आहे.)

व्हीडिओ रिपोर्ट: कीर्ती दुबे आणि देवाशिष कुमार