चांदीपुरा विषाणू लहान मुलांसाठी का घातक ठरतो आहे? #सोपीगोष्ट

चांदीपुरा विषाणू लहान मुलांसाठी का घातक ठरतो आहे? #सोपीगोष्ट

गुजरात राज्यात आतापर्यंत चांदीपुरा व्हायरसचे 12 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं गुजरात सरकारने म्हटलंय. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजीकडे (NIV) पाठवण्यात आलेयत. 1965 साली नागपुरातल्या एका परिसरातल्या रुग्णांच्या रक्तामध्ये एक व्हायरस आढळला. ज्या गावात ६५ साली हा व्हायरस सापडला, त्याचं नाव व्हायरसला देण्यात आलंय. - चांदीपुरा विषाणू.

किती घातक आहे हा विषाणू? य़ाचा प्रसार आणि संसर्ग कसा होतो? आणि मुलांसाठी तो जीवघेणा का ठरतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

लेखन - अमृता दुर्वे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले