लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान इस्रायलचे हल्ले कॅमेऱ्यात कैद झाले तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान इस्रायलचे हल्ले कॅमेऱ्यात कैद झाले तेव्हा...
लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान इस्रायलचे हल्ले कॅमेऱ्यात कैद झाले तेव्हा...

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले न्यूज चॅनेल्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच सीरियावर ड्रोन हल्लेही झाले होते, ज्यात तीन मृत्यू आणि 34 जण जखमी झाल्याचं सीरियन अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इस्रायलने हे ताजे हल्ले ड्रूझ या सीरियातील अल्पसंख्याक, पण सशस्त्र गटाचं रक्षण करायला सुरु केल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे सीरियाचे अंतरिम नेते अहमद अल-शरा म्हणाले की ड्रूझ नागरिकांचं रक्षण करण्याला आपण प्राधान्य देत आहोत.

दरम्यान या भागात अचानक संघर्ष उफाळल्यामुळे शांतता प्रस्थापित करायला दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी झाल्या आहेत