‘कविता नसती तर 6-7 वेळा मरून झालं असतं’ गोष्ट दुष्काळ जगणाऱ्या कवीची
‘कविता नसती तर 6-7 वेळा मरून झालं असतं’ गोष्ट दुष्काळ जगणाऱ्या कवीची
बारामतीच्या सुपेजवळच्या गावातले हनुमंत चांदगुडे यांचं अख्खं आयुष्य दुष्काळानेच घडवलं. अशा या दुष्काळी भागातले अनुभव गाठीशी घेऊन चांदगुडे यांनी कविता लिहायला सुरुवात केली.
आजपर्यंत त्यांची कवितेची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. यातली काही हिंदीतही भाषांतरीत झाली आहेत.
आठवी शिकलेल्या चांदगुडेंची कविता आता तर शालेय अभ्यासक्रमात इयत्ता आठवीच्या पुस्तकात आहे.
पाहा त्यांचा हा प्रवास.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे






