200 चेले असलेल्या तृतीयपंथी 'गुरू माँ'ला अटक का झाली?, पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, 200 चेले आणि 20 मालमत्ता असलेल्या तृतीयपंथी गुरू माँ ला अटक का झाली?
200 चेले असलेल्या तृतीयपंथी 'गुरू माँ'ला अटक का झाली?, पाहा व्हीडिओ

मुंबई पोलिसांनी गोवंडी परिसरात बांगलादेशातून आलेली आणि 'गुरू माँ' या नावाने ओळखली जाणारी तृतीयपंथी महिला गुरू माँ उर्फ बाबू खान हिला 17 ऑक्टोबर 2025 रोजी अटक केली.

या कथित 'गुरू माँ'ने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी भारतीय कागदपत्रे बनवून गेल्या 30 वर्षापासून अवैधरित्या भारतात वास्तव्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

महत्त्वाचं म्हणजे, 'गुरु माँ'च्या नावे मुंबईतील रफिक नगर आणि गोवंडीसह विविध भागांत 20 हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, विविध पोलीस ठाण्यामध्ये पाच गुन्हे देखील तिच्या नावावर आहेत.

"गुरु माँ'च्या आश्रयात 200 पेक्षा अधिक तृतीयपंथी मुंबई उपनगरात विविध ठिकाणी वास्तव्य करतात, अशी पोलीस तपासातील माहिती आहे.

सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आडेलकर यांनी मुंबई पोलिसांना मुंबईत अवैधरित्या बांगलादेशी तृतीयपंथी असल्यासंदर्भात जानेवारी महिन्यात तक्रार दिली होती. यावरून ही कारवाई झाल्याचा दावा आडेलकर करत आहेत.