झाडांना मिठ्या मारून या लोकांना काय मिळवायचंय?

व्हीडिओ कॅप्शन, झाडांना मिठ्या मारून या लोकांना काय मिळवायचंय?
झाडांना मिठ्या मारून या लोकांना काय मिळवायचंय?

पुणे महापालिकेने हाती घेतलेल्या नदीसुधार प्रकल्पामुळे वृक्षसंपदेची होणारी हानी आणि तोडली जाणारी झाडं याविरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र यायचं ठरवलं आहे.

हा प्रकल्प 'मुळा-मुठा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट' या नावानेही ओळखला जातो. या प्रकल्पाअंतर्गत नद्यांच्या काठी अर्थपूर्ण सार्वजनिक क्षेत्र निर्माण केलं जाईल, असं पुणे महापालिकेचं म्हणणं आहे.

या प्रकल्पाचं काम सुरू झालं आहे. या प्रकल्पाचं काम 11 टप्प्यांत होईल. या प्रकल्पासाठी साधारणपणे साडेपाच हजार कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.

रिपोर्ट - मानसी देशपांडे

शूट - प्रदीप खेंगरे, नितीन नगरकर

एडिट - निलेश भोसले

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)