महाराष्ट्रात 'मतचोरी' झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं उत्तर

महाराष्ट्रात 'मतचोरी' झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं उत्तर

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांची नावं मोठ्या प्रमाणात गाळण्यात आली असून, ती वगळण्याची शिफारस ज्यांनी केली त्यांनाही याची कल्पना नव्हती.

उदाहरण म्हणून त्यांनी कर्नाटकमधील आळंद आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेख केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)