डॉ. संग्राम पाटील : 'माझ्याबाबत असं काहीतरी होईल, याची कल्पना होतीच' - पाहा मुलाखत
डॉ. संग्राम पाटील : 'माझ्याबाबत असं काहीतरी होईल, याची कल्पना होतीच' - पाहा मुलाखत
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि युट्युबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
संग्राम पाटील यांच्या विरोधात बजावण्यात आलेल्या लुकआउट सर्क्युलरमध्ये (LOC) बदल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 5 मे 2026 रोजी दिले आहेत.
त्यामुळे, आता संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोशल मीडिया पोस्टवरून मानहानी व इतर कलमांखाली डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली होती.
'आपल्या नेत्याबद्दल द्वेषाची भावना पसरवली,' अशी तक्रार करण्यात आल्याने त्यांच्याविरोधात मानहानीची कलमं लावण्यात आली आहेत.
हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर बीबीसीसाठी अल्पेश करकरे यांनी डॉ. संग्राम पाटील यांची मुलाखत घेतली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



