बुलढाणा केस गळती प्रकरणाचं भयावह वास्तव दाखवणारा व्हीडिओ, नेमकं काय घडतंय?

व्हीडिओ कॅप्शन, बुलढाणा केस गळती प्रकरण : कुणाचं लग्न रखडलं तर कुणाला गाठी आल्या, नेमकं काय घडतंय?
बुलढाणा केस गळती प्रकरणाचं भयावह वास्तव दाखवणारा व्हीडिओ, नेमकं काय घडतंय?

बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांत लोकांचे अचानक इतके केस गळू लागले, तर काही जणांना टक्कल पडू लागलं. पाहता-पाहता केसगळतीच्या या रुग्णांचा आकडा 188 वर पोहोचला आहे. बोंडगाव आणि पहुरजिरा ही दोन गावं सर्वाधिक बाधित आहेत.

यात शेगाव तालुक्यात 181 तर नांदुरा तालुक्यात 7 रुग्ण आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असल्यानं गावकरी दहशतीत आहेत. केसगळतीची इतकी दहशत पसरलीय की आता गावातील लोकांच्या सोयरिकींवरही याचा परिणाम होऊ लागलाय.

पाहूयात याबाबतच भीषण वास्तव दाखवणारा व्हीडिओ.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.