세션 8
Listen to find out how to ask how old somebody is.
एखाद्याला त्याचं वय कसं विचारायचं ते शिकू या.
[Image credit: Getty Images]
엑티비티 1
तुझं वय काय?
Listen to find out how to ask how old somebody is.
एखाद्याला त्याचं वय कसं विचारायचं ते शिकू या.
Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Tejali
नमस्कार मित्रांनो. बीबीसीच्या Essential English Conversationवर्गात मी तुमचं स्वागत करते. इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी. मी तेजाली. आजच्या भागात आपण एखाद्याला त्याचं वय कसं विचारायचं ते शिकणार आहोत. तसं कोणाला वय विचारणं चुकीचंच, पण तरी. माहिती हवं ना. चला जीना आणि टॉम काय बोलतायत ऐकू या.
Gina
How old are you?
Tom
I’m thirty-five. How about you?
Gina
I’m twenty-three.
कठीण वाटतंय का? Don’t worry. मी परत सांगते. आपण प्रॅक्टिस करू. आधी जीनाने टॉमला विचारलं, तुझं वय काय ‘How old are you?’ आता हे ऐका आणि त्यामागे म्हणा.
How old are you?
Tejali
मग टॉम म्हणाला, मी ३५ वर्षांचा आहे, 'I’m thirty-five.' आपण 'I’m' चा वापर आपलं वय सांगण्यासाठी करतो. इंग्रजी आकडे सोपेआहेत, अकरा आणि बारा म्हणजे, 'eleven' आणि 'twelve' नंतरचे तेरा ते एकोणीस आकडे 'teen' ने संपतात. म्हणजे आपण म्हणतो
अकरा Eleven
बारा Twelve
तेरा Thirteen
चौदा Fourteen
पंधरा Fifteen
सोळा Sixteen
सतरा Seventeen
अठरा Eighteen
एकोणीस Nineteen
पाच आणि वीस मिळून पंचवीस होतात, तसंच इंग्रजीत 'twenty' म्हणजे वीस आणि 'five' म्हणजे पाच मिळून 'twenty five', पंचवीस होतात. 'Forty seven' म्हणजे 'forty', चाळीस आणि 'seven' म्हणजे सात. वीस ते नव्वद आकडे इंग्रजीत असे म्हणतात.
वीस Twenty
तीस Thirty
चाळीस Forty
पन्नास Fifty
साठ Sixty
सत्तर Seventy
ऐंशी Eighty
नव्वद Ninety
Tejali
मगटॉम म्हणाला, मी ३५ वर्षांचा आहे, ‘I’m thirty-five.’ आता हे ऐका आणि त्यामागे म्हणा.
I’m thirty-five.
टॉमला पण जीनाला तोच प्रश्न विचारायचाय, तो म्हणाला, तुझं काय? ‘How about you?’ आता हे ऐका आणि त्यामागे म्हणा.
How about you?
शेवटी जिनाने टॉमला सांगितलं की, तिचं वय तेवीस वर्षं आहे. आता हे ऐका आणि त्यामागे म्हणा.
I’m twenty-three.
आता वेगवेगळ्या लोकांनी त्यांचं वय कसं सांगितलं ते ऐका.
How old are you?
I’m seventeen. How about you?
I’m sixteen.
How old are you?
I’m fifty-eight. How about you?
I’m seventy-four.
How old are you?
I’m forty two, how about you?
I’m twenty six.
Tejali
बरं. परत एकदा करू या. ही वाक्य ऐका आणि त्या मागे म्हणा.
How old are you?
I’m thirty-five. How about you?
I’m twenty-three.
छान! बघू या तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. आपण आता मराठीत ऐकूया आणि तुम्ही मग ते इंग्रजीमध्ये बोला.
तुझं वय काय?
How old are you?
मी ३५ वर्षांचा आहे, आणि तू?
I’m thirty-five. How about you?
मी 23 वर्षांची आहे.
I’m twenty-three.
मस्त. आता, एखाद्याला वय कसं विचारायचं ते समजलं आहे तुम्हाला. आता जीना प्रश्न विचारेल, त्याला उत्तर देऊन प्रॅक्टीस करा.
How old are you?
I’m twenty-three.
Great ,आता हे संपूर्ण संभाषण ऐका आणि तुमचं उत्तर तपासा.
Gina
How old are you?
Tom
I’m thirty-five. How about you?
Gina
I’m twenty-three.
छान! आता तुम्हाला इंग्रजीमध्ये कोणाचं वय विचारताना अडचण येणार नाही. जे शिकलात ते लक्षात ठेवा. नातेवईक, मित्र-मैत्रिणींबरोबर त्याचा सराव करत रहा.
पुन्हा भेटू Essential English च्या पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!
Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
योग्य पर्याय निवडा, बघू या काय काय समजलंय तुम्हाला!
तुझं वय काय?
3 Questions
Choose the correct answer. योग्य पर्याय निवडा.
도움
엑티비티
Choose the correct answer. योग्य पर्याय निवडा.
힌트
मी ____वर्षांचा आहे.Question 1 of 3
도움
엑티비티
Choose the correct answer. योग्य पर्याय निवडा.
힌트
तीन शब्दQuestion 2 of 3
도움
엑티비티
Choose the correct answer. योग्य पर्याय निवडा.
힌트
आकड्यांचा शेवट कसा होतो बघा.Question 3 of 3
Excellent!Great job!네 안타깝군요이번 점수입니다:
Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात... असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी!!! धन्यवाद!!!
Session Vocabulary
How old are you?
तुझं वय काय?I’m ______.
मी ______वर्षांचा आहे.How about you?
आणि तू ?eleven
अकराtwelve
बाराthirteen
तेराfourteen
चौदाfifteen
पंधराsixteen
सोळाseventeen
सतराeighteen
अठराnineteen
एकोणीसtwenty
वीस