गावातली 10 टक्के घरं आणि सर्व सार्वजनिक इमारती ग्रिडशी जोडल्या गेल्या की त्या गावाचं विद्युतीकरण झाल्याची सरकार दरबारी नोंद होते. ऑगस्ट 2015मध्ये मोदींनी 15 हजार कोटी खर्चून डिसेंबर 2018 पर्यंत देशातल्या सर्व घरांत वीज जोडणी देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं.
या योजनेत 597,464 गावं आणि पाच कोटी घरांपर्यंत वीज पोहोचवण्यात आली आहे.
1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशानं खूप प्रगती केली आहे.
1947मध्ये...
फक्त 1500 गावांतच वीज होती.
2005-2014 या काळात...
1,082,280 गावांत वीज पोहोचली.
मे 2018 पर्यंत...
आणखी 18,452 गावांमध्ये वीज पोहोचेल. त्यामुळे देशातल्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचलेली असेल.
बहुतांश गावांमध्ये काही नाकाही स्वरूपात वीज जोडणी पोहोचली असली तरी दुर्गम भागातल्या घरांपर्यंतवीज पोहोचवणं खर्चिक असतं.
वीज पुरवठ्यातली अनिश्चितता आणि महिन्याचं बील यामुळे काही लोक वीज जोडणी नाकारू शकतात.







