मुंबईची दहिसर नदी आणि नदीकाठची माणसं त्यांच्या जगण्याची गोष्ट
मुंबईच्या मधोमध असणाऱ्या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या शहरातून जातात. या नद्यांच्या कहाण्या जमवण्याचं, त्या नद्यांच्या काठी राहणाऱ्या जंगलातल्या माणसांचं जगणं काय आहे हे समजून घेण्याचं काम अस्लम सय्यद हा तरुण करतोय.
मानववंशशास्त्र आणि आर्किओलॉजी यात रस असणाऱ्या अस्लमला शहरी मुंबईकरांचं लक्ष नदीकडे वेधून घ्यायचंय. म्हणूनच तो दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि मिठी नद्यांच्या काठी पूर्वीपासून नांदणाऱ्या संस्कृतीविषयी भरभरून बोलतो. बीबीसी मराठीच्या टीमने दहिसर नदीच्या काठावरून त्याच्यासोबत प्रवास केला.
रिपोर्ट - मयूरेश कोण्णूर
शूट, एडिट - शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)