इराणमध्ये महिला सार्वजनिकरीत्या हिजाब का जाळतायत? । सोपी गोष्ट 691
इराणमध्ये 22 वर्षीय एका महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर तिथे महिलांचं आंदोलन चांगलंच पेटलंय. ही महिला हिजाबसक्तीचा विरोध करत होती. आणि तिला अटक केल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा जनतेचा दावा आहे.
इराण हा इस्लामिक रिपब्लिक देश आहे. आणि तिथे सार्वजनिक ठिकाणी महिलांनी काय परिधान करावं यासाठी कडक ड्रेसकोड आहे. त्या विरोधात 2014 पासून महिला तिथं आंदोलन करतायत. पण, या ताज्या हिंसक घटनेनंतर हिजाबविरोधी आंदोलन पुन्हा ऐरणीवर आलंय. यावेळी त्याची व्याप्तीही मोठी आहे. इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि महिलांचा हिजाब विरोधाचा लढा याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)