'ती माहेरी आल्यावर सांगायची सासरी काय त्रास होतोय'

सोलापूरमध्ये कौटुंबिक हिंसाचारामुळे अंजली कदम या महिलेचा बळी गेला. आणि माहेरच्या नातेवाईंकांनी संतापून तिची चिता तिच्या सासरच्या घरासमोरच रचली.

सासरच्या व्यक्तींनी छळ केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना तपासात आढळलंय. टेंभुर्णी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय, तर चार जणांना अटक केलीये.

पण परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत लोक का थांबतात हे आम्ही कायद्याच्या अभ्यासक अॅडव्होकेट अर्चना मोरे यांना विचारलं.

त्यांच्या मते, "मुली कायद्याची मदत न घेण्याचं एक कारण म्हणजे आपल्याकडे विवाहीत मुली होणाऱ्या अत्याचाराविरोधात कायदे कोणते आहेत, तर IPC 498 अ, 304 ब... पण या अंतर्गत जर मला तक्रार द्यायची आहे तर मला पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार. नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना अटक होऊ शकेल."

"पण खरंतर कौटुंबिक छळापासून स्त्रियांचं संरक्षण करणाऱ्या कायद्याची जमेची बाजू ही आहे की पत्नी आपल्या घरात राहूनच स्वतःचे हक्क मागू शकते. तिला घर सोडून जाण्याची गरज नाही. कुठलीही स्त्री, तिच्या लग्नाच्या नात्यात असेल किंवा रक्ताच्या नातेवाईकांमध्ये असेल, दत्तकत्वाच्या नात्यामध्ये छळ होत असेल किंवा लग्न सारख्या नात्यामध्ये असेल जसे की लिवह्इनमध्ये ती स्त्री या कायद्याअंतर्गत दाद मागू शकते," असंही मोरे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)