अमेरिकेतील ‘हे’ राज्य मागची 23 वर्षं दुष्काळात जगतंय

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेतील ‘हे’ राज्य मागची 23 वर्षं दुष्काळात जगतंय

अमेरिकेतल्या पश्चिम किनाऱ्यावर भीषण दुष्काळाचं सावट पसरलं आहे. कॅलिफोर्निया राज्यात त्यामुळे पाण्याच्या वापरावर निर्बंधही घालण्यात आले आहेत.

राज्यातली एकूण परिस्थिती बघता, दुष्काळ येणाऱ्या काळात आणखी उग्र रूप धारण करेल अशीच चिन्ह दिसतायत. आणि त्यामुळे नासा सारखी संस्थाही जमिनीतल्या पाण्याच्या स्तराचा अभ्यास करतेय.

पण, त्याचवेळी पाण्याचे इतके निर्बंध असतानाही श्रीमंतांच्या बंगल्यासमोरच्या बागेत मात्र स्प्रिंकलरचा सर्रास वापर होतोय. लोकांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. पाहूया या रिपोर्ट…

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)