ताडोबा, गडचिरोलीचे हत्ती गुजरातच्या जामनगर का नेले जात आहेत?
एकूण 13 हत्ती चंद्रपूर आणि गडचिरोलीहून जामनगरला पाठवले जाणार आहेत. त्यासाठीची कायदेशीर आणि शासकीय प्रक्रियासुद्धा पूर्ण झाल्यानंतर 2021च्या नोव्हेंबरमध्ये त्यासाठीचं नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं.
जामनगरमध्ये तयार होत असलेल्या रिलायन्सच्या राधेकृष्ण टेम्पल एलिफन्ट वेलफेअर ट्रस्टच्या मोठ्या प्राणी संग्रहालयात हे हत्ती हस्तांतरित करण्यात येत आहे. पण स्थानिकांचा या हस्तांतरणाला विरोध होता.
इथेच एक चांगला एलिफंट पार्क उभारला जावा, अशी त्यांची मागणी होती. महाराष्ट्र सरकार त्या दिशेने प्रयत्नही करेल, असं चंद्रपूरचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते.
पण राज्य सरकारच्या त्या संभाव्य एलिफंट पार्कचं पुढे काही झालं नाही, आणि अखेर हे हत्ती आता गुजरातच्या दिशेने निघालेत.
व्हीडिओ – सुमीत पाकलवार, बीबीसी मराठीसाठी
निर्मिती – गुलशनकुमार वनकर
(टीप: व्हीडिओमध्ये दिसणारे अधिकारी हे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आहेत. त्यांचं नाव चुकून प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये असं देण्यात आलंय. चुकीबद्दल दिलगीर आहोत.)
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)