केरळ हत्ती : तिच्या मृत्यूला जबाबदार कोण?

व्हीडिओ कॅप्शन, केरळ हत्तीण : फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने मृत्यू, सर्वत्र संताप

फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने एका गर्भार हत्तीणीचा केरळमध्ये मृत्यू झालाय. माणूस आणि प्राण्यांतला संघर्ष पुन्हा एकदा यामुळे समोर आलाय.

ही हत्तीण 14-15 वर्षांची असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. स्फोटकांमुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती आणि मदतीसाठी आलेलं पथक तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या हत्तीणीने सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं होतं.

पाण्यात उभ्या या हत्तीणीचा 27 मेला मृत्यू झाला. तिचा मृतदेहाचं जवळच्याच एका ठिकाणी नेऊन पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. ही हत्तीण गर्भार असल्याचं त्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यावरचाच हा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)ॉ