ऐश्वर्याची ज्यासाठी चौकशी झाले ते पनामा पेपर्स काय आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, ऐश्वर्याची ज्यासाठी चौकशी झाले ते पनामा पेपर्स काय आहेत?

समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन संसदेत भडकल्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण यावेळी त्या कशामुळे चिडल्या, ते नेमकं कळू शकलं नाही.

त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सत्ताधारी बाकांमधून कुणी कमेंट केली, त्यामुळे त्यांना राग आला एवढंच कळलं. पण कुणी काय म्हटलं हे गदारोळात ऐकू आलं नाही.

पण त्या चिडल्या त्याच सुमारास त्यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची पनामा पेपर्स प्रकरणी एडीने चार तास चौकशी केली. पनामा पेपर्स काय आहेत आणि ऐश्वर्याने नेमकं असं केलंय ज्यामुळे त्यांची चौकशी होतेय? पाहूया सोपी गोष्टमध्ये.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )