हरित हायड्रोजनमुळे जागतिक तापमान वाढ आटोक्यात येईल का?
कार्बन वायू उत्सर्जन कमी करून स्वच्छ ऊर्जास्त्रोतांकडे जायचं असेल तर त्यासाठी तज्ज्ञांचा भरवसा आहे तो हायड्रोजन इंधनावर. त्यादृष्टीने विविध देशांमध्ये वेगवेगळे प्रयोगही सुरू आहेत.
डेन्मार्कमध्ये एका प्रकल्पात पवनऊर्जेवर प्रक्रिया करून हरित हायड्रोजन वायू इंधन म्हणून मिळवला जातोय. सध्या छोटेखानी असलेला हा प्रकल्प यशस्वी झाला तर जीवाश्म इंधनांसाठी हरित हायड्रोजन हा मोठा पर्याय म्हणून समोर येईल.