एक आई तिच्या मुलाला मुलगी म्हणून स्वीकारते तेव्हा...
मुंबईत राहणाऱ्या सुप्रिया गोसावी यांनी आधी आपल्या पतीला गमावलं आणि मग त्यांना नंतर कळलं की त्यांचा वयात आलेला मुलगा ट्रान्सजेंडर आहे. तो स्वतःला पुरुष नाही तर स्त्री समजतो. अशात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
LGBTQ समुदायातल्या लोकांना त्यांच्या घरचे अनेकदा स्वीकारत नाहीत हे आपण अनेकदा ऐकतो, पाहातो. पण जे स्वीकारतात, त्यांचा प्रवास कसा असतो? आयुष्यभर काही ठराविक मुल्यं आणि संकल्पना मनाशी बाळगल्यानंतर आपल्या मुलांच्या प्रेमाखातर त्यात बदलताना अशा पालकांच्या मनात काय चालू असतं?
या स्टोरीतून बीबीसी मराठीने हेच मांडलंय.
रिपोर्ट – अनघा पाठक
शूट – शाहिद शेख
एडिट – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)