सुल्ली ॲप: महिलांची ऑनलाईन बदनामी कशी थांबवायची? | सोपी गोष्ट 377
तुम्ही महिला असाल आणि एकेदिवशी अचानक तुम्हाला कळलं की, तुमचा फोटो आणि सोशल मीडियावरची तुमची इतर माहिती वापरून इंटरनेटवर तुम्हाला बदमान करण्यात येतंय तर? फक्त बदनामीच नाही तर तिथं तुमच्याबद्दल अश्लील बोललं जातंय आणि तुम्हाला चक्क विकायला काढलंय तर? संताप तर येईलच पण, त्याचबरोबर काही क्षण अगदी असहाय्य पण वाटेल.
काही मुस्लीम महिलांच्या बाबतीत अलीकडे तसंच झालंय. सुल्ली डिल्स नावाचं एक ओपन सोर्स ॲप त्यासाठी तयार करण्यात आलं होतं. बदनामी झालेल्यांच्यामध्ये काही प्रथितयश मुस्लीम महिला पत्रकारही आहेत.
दिल्ली आणि मुंबई पोलीस सध्या हा गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेतायत. यानंतर हे ॲप डिलिटही करण्यात आलंय. पण, त्यानिमित्ताने सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया महिलांची अशी बदनामी कशी थांबवता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं सोशल मीडिया प्रोफाईल कसं सुरक्षित ठेवायचं?
संशोधन - कीर्ती दुबे
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)