पोप फ्रांसिस इराक भेटीनंतर इराकमधील ख्रिश्चन समुदायाला संरक्षण मिळेल?
कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रांसिस यांनी पहिल्यांदाच इराकला भेट दिली.
इराकमध्ये सुन्नी पंथियांकडून ख्रिश्चन समाजावर होणारे अत्याचार थोपवण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जातेय. या भेटीत त्यांनी मुस्लीम शिया पंथाचे धर्मगुरु अल सिस्तानी यांची भेट घेतली.
याशिवाय त्यांनी एकेकाळी इस्लामिक स्टेटच्या दहशतवादाचं वर्चस्व असलेल्या इराकमधील अनेक शहरांना भेटी दिल्या.
इराकी कुर्दीस्तान भागातील अर्बिल शहरात तर हजारोंच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमही पार पडला. पोप फ्रांसिस यांच्या इराक भेटीविषयीचा बीबीसी प्रतिनिधी मार्क लोवेन यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)