लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद दौऱ्यावेळी काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद दौऱ्यावेळी काय घडलं?

लाल बहादूर शास्त्रींनी 1965 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताचं नेतृत्व केलं. युद्धानंतर लगेचच त्यांनी रामलीला मैदानातून पाकिस्तानच्या मनसुब्यांवर टीका केली होती.

1966 मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल अयूब खान यांच्यासोबत शांतता करार करण्यासाठी ते ताश्कंदच्या दौऱ्यावर गेले होते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये त्यावेळी सोव्हिएत संघाने मध्यस्थी केली होती. 10 जानेवारी 1966 ला ताश्कंद इथे भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतता करारावर सह्या झाल्या.

पण 11 जानेवारी 1966 ला ताश्कंद इथेच शास्त्री यांचं निधन झालं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)