जेव्हा दररोज 5 ते 10 रोहिंग्या निर्वासितांचे भूकबळी जात होते...
कोरोना व्हायरसचा उद्रेक म्हणावा तसा आटोक्यात आला नाही आहे. आणि बळी पडणाऱ्या लोकांमध्ये गरीब निर्वासित आणि स्थलांतरित लोकांची संख्याही जगभरात मोठी आहे.
रोहिंग्या मुस्लीम निर्वासितांचा प्रश्न गेलं वर्षभर गाजतोच आहे. चांगल्या आयुष्याच्या शोधात बांगलादेशहून निघालेल्या काही निर्वासितांनी समुद्रमार्गे मलेशिया किंवा इतर सधन देश गाठण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातले किमान दोनशे लोक जीवघेण्या समुद्र सफरीतच मारले गेले आहेत. कोव्हिड 19 च्या निर्बंधांमुळे कुठल्याही देशात या लोकांना आसरा मिळू शकत नाही. अशा निराधार अवस्थेत समुद्रात भूक नाहीतर रोगाने त्यांचा जीव गेला. यातून जे जगले-वाचले अशा तीन प्रातिनिधिक लोकांच्या या कहाण्या...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)