कोरोनाः ऑनलाईन शिक्षणात कठीण विषय कठपुतळ्यांनी कसे सोपे केले ?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र कोरोना: ऑनलाईन शिक्षणात कठपुतळ्यांनी आणली धम्माल.

नलिनी आहिरे नाशिक जिल्ह्यातल्या बाणगंगानगर या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकवतात. ऑनलाईन शिक्षण या वस्तीपाड्यावरच्या मुलांना कंटाळवाणं वाटू नये म्हणून त्यांनी कठपुतळ्यांव्दारे शिकवण्याची शक्कल लढवली.

दुर्गम भागातल्या मुलांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही, त्यात जमवाजमव केली तरी मुलांना कंटाळा. त्यामुळे मुलांची शिकण्याची ओढ कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्या मुलांच्या घरी जाऊन शिकवत असल्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेही बंद झालं. या उपक्रमाला मुलांचा छान प्रतिसाद मिळत असल्याचं त्या सांगतात.

रिपोर्टर- अनघा पाठक

कॅमेरा- प्रवीण ठाकरे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)