दिल्ली दंगल: पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमांमध्ये विरोधाभास का?
दिल्ली पोलिसांनी दिल्ली दंगलीशी संबंधित 751 प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल केले आहेत.
परंतु पोलिसांनी या दंगलीशी निगडित कागदपत्रं सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून द्यायला नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत घडलेल्या दंगलींशी संबंधित माहिती जमवणं आव्हानात्मक झालेलं आहे, पण बीबीसीने तपासाशी संबंधित न्यायालयीन आदेश, आरोपपत्रं यांच्या प्रती मिळवून तपास प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली दंगलीमागे अनेक कारणं होती असा पोलिसांचा दावा आहे. दिल्ली कडकडडुमा कोर्टात पोलिसांनी सादर केलेल्या घटनाक्रमांमध्ये त्या कारणांचा उल्लेख केला गेलाय. त्या घटनाक्रमांचा शोध घेत असताना बीबीसीच्या हाती काही गोष्टी लागल्या आहेत. बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधी किर्ती दुबे यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)