इराणमध्ये कोरोनाचे मृत्यू सरकारी आकडेवारीपेक्षा 3 पटीनं जास्त?

कोरोना मृत्यूबद्दलची दोन परस्परविरोधी सरकारी आकडेवारी बीबीसी पर्शियनच्या हाती लागली आहे.

त्यामध्ये कोव्हिड-19ने बाधित झालेल्या सगळ्या हॉस्पिटलची नावं आहेत. तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संशयितांची माहितीही त्यात आहे. यावरून इराणमध्ये या साथीची सुरुवात खूप आधी झाली होती. तसंच सरकारी दाव्यापेक्षा ती अधिक भयंकर होती असं लक्षात येतं.

20 जुलैपर्यंत हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या 41 हजार 952 इतकी होती. ही अधिकृत आकडेवारीपेक्षा तिपटीनं जास्त आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)