कोरोनाच्या भीतीनंतर जंगली प्राण्यांच्या मांसाच्या मार्केटवर बंदी येणार का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या भीतीनंतर प्राण्यांचं मांस खरेदी-विक्री करणाऱ्या ओलोवू मार्केटवर बंदी येणार का ?

नायजेरियामध्ये कोव्हिड-19च्या रुग्णांचा आकडा 32 हजारच्या पुढे गेलाय. जगभरामध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने त्याचा परिणाम मांस मार्केटवरही झालाय. पण जंगली प्राण्यांच्या मांसासाठी म्हणजेच बुशमीटसाठी प्रसिद्ध असलेलं नायजेरियातलं ओलोवू मार्केट अनेकांचं लक्ष वेधून घेतंय.

सुरुवातीला कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या अशाच स्वरुपाच्या वुहानमधील मार्केटमधून जगभर पसरण्यास कारणीभूत ठरला असा अंदाज शास्त्रज्ञांनी काढला होता. जंगलातील वाटवाघळाच्या शरिरातून हा व्हायरस माणसाच्या शरिरात आला असावा असं म्हटलं गेलं, पण त्याला ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पण याच पार्श्वभूमीवर नायजेरियाच्या ओलोवू मार्केटमध्ये लॉकडाऊनच्या वाढत्या निर्बंधांमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांची संख्या कमी झालीये.

पण जंगली प्राण्यांचा व्यापार सुरुच आहे. बीबीसी प्रतिनिधी कुनले फलायी यांनी जंगली प्राण्यांच्या मार्केचं अर्थकारण नेमकं कसं आहे, हे उलगडून सांगितलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)