कोरोना व्हायरस : अमेरिकेत एका दिवसात 66 हजार रुग्ण

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरसचा जगाला विळखा, अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

कोरोना व्हायरसचा जगभरातला प्रसार वाढत चाललाय. WHO ने रविवारी दिलेल्या आकडेवारीनुसार जगात एका दिवसात 2 लाख 30 हजार नवीन रुग्ण सापडलेत.

हे आरोग्य संकट आता प्रामुख्याने अमेरिका खंडात हैदोस घालतंय हे आता स्पष्ट झालंय. इथे एका दिवसात 1 लाख 40 हजार रुग्ण सापडले. जगभरातली रुग्णसंख्या आता एक कोटी 30 लाखाच्या घरात जातेय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)