'इतरांनी आमची साथ सोडली म्हणून आम्ही एकमेकींना सोडणार नाही'
देहविक्रय करणाऱ्या महिला समाजातला सगळ्यांत शोषित आणि दुर्लक्षित वर्ग आहे हे कोव्हिड-19 च्या संकटाने हे ठळकपणे अधोरेखित केलं.
पण याच संकटाला संधी बनवून भिवंडीतल्या रेडलाईट भागातल्या महिला आता इंग्लिश भाषा आणि काही कौशल्य शिकताहेत. नुस्तं शिकतंच नाही, समोरच्याला फर्डा इंग्लिश बोलूनही दाखवत आहेत.
याआधी इथल्या महिलांना लिहायला वाचायला शिकवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते.
काही महिन्यांनी व्यवसाय पुन्हा सुरु झाला तरी शिकत राहायचं असा निर्धार या महिलांनी केला आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)