चीन हाँगकाँगमध्ये नवा कायदा आणून अटकसत्र का चालवतंय?

व्हीडिओ कॅप्शन, चीन हाँगकाँगमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड का करतंय?

गेलं वर्षभर हाँगकाँगला चीनविरोधी निदर्शनांनी हादरवून सोडलंय. पण हे सगळं आता बदलणार आहे.

आता चीनने संमत केलेल्या नव्या कायद्यानुसार अशी निदर्शनं बेकायदेशीर आणि राष्ट्रविरोधी ठरवली जाऊन निदर्शकांना जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते.

हा कायदा हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर गदा आणणारा असल्याचं इथल्या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी म्हटलंय. हा कायदा आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपण राजकारणापासून दूर होत असल्याचं जाहीर केलंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)